*शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी…!
*बृहन्मुबई महानगरपालिकेत (BMC) लवकरच कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता ही पदे भरली जाणार.
बृहन्मुबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असून, या भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. पालिकेतील ६६४ रिक्त पदे भारण्यासाठी ऑनलाइन भरती परीक्षा घेण्याकरिता IBPS या संस्थेची नेमणूक यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून सरकारच्या मान्यतेनंतर जाहिरात प्रसिद्ध होईल.कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरली जातील.
* कनिष्ठ अभियंता सिव्हिल-२३६ पदे,
* कनिष्ठ अभियंता एम. अँड ई-११६ पदे,
* दुय्यम अभियंता सिव्हिल -२३३ पदे
* दुय्यम अभियंता एम अँड ई – ७७ पदे
* वास्तुविशारद – ९ पदे
अशा प्रकारे पदे भरली जाणार आहेत.भरतीसंदर्भात आरक्षण तसेच बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, ती अंतिम टप्यात आहे. पुढील १५ ते २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध होईल. भरतीसाठी सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे. ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया तसेच निकाल यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च आहे. तरी अतिशय चांगली सुवर्णसंधी पदवी व पदविका धारक तरुणांसाठी चालून आलेली आहेसंकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा .